Bhosari : जाब विचारल्याने एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – बिछान्यावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने एकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 17) मध्यरात्री भोसरी येथे घडली.

सिद्धार्थ हनुमंतराव कांबळे (पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. जयपाल राजू पालकर (वय 22, सेंच्युरी एन्का अपार्टमेंट कॉलनी, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. 17) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचे वडिल राजू पालकर हे कंपनीच्या मालकीच्या खोलीमध्ये झोपले होते. त्यावेळी आरोपी सिद्धार्थ कांबळे याने राजू पालकर यांच्या बिछान्यावर लघुशंका केली. यामुळे राजू पालकर यांनी त्याला जाब विचारला. या कारणावरून चिडलेल्या आरोपी कांबळे याने व्यायाम करण्याच्या रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी पळून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.