BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari: कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील उर्वरित कामासाठी पावणेनऊ कोटीचा खर्च

122
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरीतील गावजत्रा मैदानालगत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या केंद्रातील उर्वरीत कामे करण्यासाठी आणखी पावणेनऊ कोटी रूपये खर्च होणार आहे. या खर्चाला स्थायी समितीने आज (मंगळवारी)मंजुरी दिली.  

भोसरी येथे सर्व्हे क्रमांक एक मध्ये गावजत्रा मैदानालगत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या कुस्ती केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या केंद्राला ‘मारूतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र’ असे नाव देण्यात येणार आहे. 8 हजार 600 चौरस मीटर जागेत 5 हजार 760 चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये हे केंद्र उभारण्यात येत आहे.  कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

कुस्ती केंद्रातील उर्वरीत अनुषंगिक कामेही करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या कामासाठी 9 कोटी 18 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 9 कोटी 14 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी बी. के. खोसे या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 4.54  टक्के कमी दराने निविदा सादर केली. सन 2018-19  च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्विकृत योग्य दरापेक्षा 10.6  टक्क्याने कमी येत आहे.

म्हणजेच कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या उर्वरीत कामासाठी 8 कोटी 77 लाख रूपये खर्च होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 30 नोव्हेंबर रोजी निविदा स्विकारण्यास मान्यता दिली आहे. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3