Bhosari : भोसरी येथे कंपनीतून साहित्य चोरीस

Material stolen from company at Bhosari

एमपीसी न्यूज – कंपनीच्या प्रवेशद्वारावरून उडी मारून आत आलेल्या चोरट्यांनी कंपनीतील 12 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 23) एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली.

याप्रकरणी सुधीर नारायण भांदुर्गा (वय 55, रा. प्राधिकरण कार्यालयासमोर, निगडी) यांनी बुधवारी (दि. 24) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीटमेटल प्रेस पार्ट ही कंपनी आहे. सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी प्रवेशद्वारावरून आत उडी मारून कंपनीत प्रवेश केला. चोरट्यांनी कंपनीतील 12 हजार रुपये किंमतीचे पेट्रोल टॅंकचे 700 नग चोरून नेले.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.