Bhosari : मातृभूमी ढोल ताशा पथकातील ताईंनी बांधली पोलीस बांधवाना राखी

एमपीसी न्यूज- दरवर्षी प्रमाणे रक्षाबंधनाचे औचित्य साधून मातृभूमी ढोल ताशा पथकातील ताईंनी भोसरी पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांना राखी बांधून सर्व पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व आभार व्यक्त केले.

वर्षभर कायदा व सुरक्षेसाठी सर्व पोलीस दल तैनात असते. कर्तव्य करत असताना ते आपले कुटुंब, नातेवाईक व मित्र मंडळींना वेळ देऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणी जाऊन मातृभूमी ढोल ताशा पथकातील ताईंनी त्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद जाधव, पोलीस निरीक्षक,गुन्हे अजय भोसले, पोलीस कर्मचारी पाटील, वर्पे, महिला पोलीस हवालदार शैलजा साळवी व सर्व सहकारी उपस्थित होते.

नरेंद्र जाधव आणि अजय भोसले यांनी मार्गदर्शन करून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.