BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : पत्नी आणि सास-यांना बोलणा-या जावयाला मेव्हण्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज – पत्नी आणि सास-याला बोलल्याच्या रागातून मेव्हण्याने जावयाला दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) रात्री साडेसातच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.

तात्यासाहेब यशवंत सूर्यवंशी (वय 27, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे जखमी जावयाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाबू नलवडे, ओंकार भुते, प्रशांत,  पिल्या (सर्व रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तात्यासाहेब त्यांची पत्नी आणि सासऱ्यांना बोलले. यावरून आरोपी बाबू आणि त्याच्या मित्रांनी तात्यासाहेब यांना दगडाने मारहाण केली. यामध्ये तात्यासाहेब यांच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.