Bhosari : हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज- भोसरी येथील ओम हॉस्पिटल व लायन्स क्लब तळवडे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ह्दयरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार (दि. 10 नोव्हेंबर) पासून रोज सकाळी 10 ते 4 या वेळेत ओम हॉस्पिटल हुतात्मा चौक, आळंदी रोड भोसरी येथे सुरु आहे.  अशी माहिती ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील अगरवाल यांनी दिली.

या शिबिरात पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना ह्दयरोग तपासणी अंर्तगत इ.सी.जी., स्ट्रेस टेस्ट, अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन डॉ. सुनील अगरवाल यांनी केले आहे. अधिक माहिती साठी किंवा रजिस्ट्रेशन साठी 91303219766/ 8888825603/7774049691 वर संपर्क करु शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.