Bhosari : प्रजासत्ताक दिनानिमित्त ओम हॉस्पिटलतर्फे भोसरीत आरोग्य शिबिर

हृदयरोग व मधुमेह मोफत तपासणी सप्ताहचे आयोजन

एमपीसी न्यूज- प्रजासत्ताक दिनानिमित्त भोसरी येथील सुप्रसिध्द मल्टीस्पेशेलिटी अत्याधुनिक, अद्यावत तंत्रज्ञानाने सुसज्ज ओम हॉस्पिटलच्या वतीने 21 ते 31 जानेवारी दरम्यान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सर्व गरजू रुग्णांची हृदयरोग व मधुमेहाची तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

या शिबिराबाबत माहिती देताना ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक अग्रवाल म्हणाले की, एका सर्वेनुसार भारतात दरवर्षी अंदाजे 7 लाख 50 हजार व्यक्तींचा मृत्यू हद्यरोगाने होतो. तरुण वयातच मधुमेहामुळे हृदयरोग बळावतो. त्यामुळे योग्य वेळी मधुमेह व हृदयरोगाचे निदान होणे आवश्यक आहे. स्वास्थ भारत, सक्षक्त भारत, निरोगी व रोगमुक्त पुणे शहर ही संकल्पना समोर ठेवून 21 ते 31 जानेवारी दरम्यान आयोजित शिबीरात ओम हॉस्पिटलमध्ये मधुमेह आणि ई.सी.जी तपासणी करण्यात येईल आणि तज्ञाव्दारे औषधोपचाराविषयी मोफत सल्लाही देण्यात येणार आहे.

बदलत्या जीवन शैलीमुळे मधुमेह आणि हृदयरोग रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. म्हणूनच मधुमेहा सोबत हृदयरोगाचे वेळीच निदान होणे आवश्यक असते. म्हणूनच मधुमेहाची तपासणीबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने या मोफत तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. अशी माहिती ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील अग्रवाल यांनी दिली.

ओम हॉस्पिटल हे सी.जी.एच., सी.एस.एम.ए., पी.सी.एम.सी. धन्वंतरी, पी.एम.पी. एम.एल. तसेच सर्व मेडीक्लेम्स आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना करिता मान्यताप्राप्त आहे. अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली. आरोग्य शिबिरात सहभागी होण्यासाठी 7774049690, 7774049691, 7774049698 या नंबरवर संपर्क साधावा. भोसरी, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरा सोबत पुणे जिल्ह्यातील गरजूनीं या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन डॉ. अग्रवाल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.