Bhosari : गवळीनगरमध्ये पाणी प्रश्नावर महिलांची सभा 

त्रस्त महिलावर्गाने मांडली पाण्याची समस्या अधिका-यांपुढे त्रस्त महिलावर्गाने मांडली पाण्याची समस्या अधिका-यांपुढे 

एमपीसी न्यूज –  गवळीनगर प्रभाग क्रमांक ५ मध्ये अनियमित पाणीपुरवठ्याबाबत प्रभागातील महिलांची सभा पार पडली. रोजचा होणारा अनियमित पाणीपुरवठा यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे. लवकरात लवकर पाणीपुरवठा नियमित करावा, अशी मागणी या सभेत महिलावर्गांकडून करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

गवळीनगर ई  क्षेत्रीय कार्यालय येथे नगरसेविका प्रियंका बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा झाली. यावेळी कार्यकारी अभियंते रवींद्र पवार, कनिष्ट अभियंते सुनील बेळगावकर, जलनिस्सारण विभाग अमोल शेलार आदी उपस्थित होते.

काही ठिकाणी २० वर्षापासून ड्रेनेज व पाईप लाईन जवळ आहे. ती नवीन व स्वतंत्र टाकावी असे संगीता शेलार, सुदाम देवरे, प्रकाश जोशी. अनिता  घाणेकर यांनी समस्या मांडली. पोटे चाळ येथे पाण्याचा वास येतो. तरी पाणीपुरवठा विभागाने हा प्रश्न सोडवावा. जादा दाबाने पाणी सोडा, पाण्याला प्रेशर नाही. नवीन लाईन टाकून ही समस्या सोडविण्यात य़ेईल, असे सुनील बेळगावकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.