Bhosari Crime : मदतीसाठी आलेल्या पोलिसाला शिवीगाळ करत पोलिसांची गाडी फोडली

एमपीसी न्यूज : मध्यरात्री भोसरीकडून नाशिक फाटाकडे एक इसम आरडा-ओरड करत पायी चालला होता.त्याला अडवून पोलिसांनी विचारपूस केली तर त्या पठ्ठ्याने पोलिसालाच शिवीगाळ करत पोलिसाच्या कारवर दगडमारून काच फोडली. त्याची वागणूक बघून पोलिसांनीही त्याला सरकारी पाहूणा केला.(Bhosari Crime) हा प्रकार सोमवारी (दि.19) अडीचच्या सुमारास घडला.

राम कुंडलिक शिंदे (वय 34, रा. घोडकी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो जेसीबी चालक असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रामदास वाव्हळ यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Burglary cases : मोशी आणि माण येथे भरदिवसा घरफोडीच्या घटना, सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामदास वाव्हळ हे भोसरी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. सोमवारी मध्यरात्री ते रात्रपाळी कर्तव्यावर होते. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आरोपी राम शिंदे हा मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करत पायी जात होता.(Bhosari Crime) त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याने वाव्हळ यांनी त्याला आपण पोलीस असल्याचे सांगून मदतीसाठी विचारपूस केली. त्यावर त्याने फिर्यादींसोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली.

भोसरी वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर पार्क केलेल्या पोलीस व्हॅनवर दगड मारून काच फोडून नुकसान केले. फिर्यादी यांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.(Bhosari Crime) भोसरी पोलिसांचे बिट मार्शल आणि डायल 112 ही पथके पोलीस शिपाई रामदास वाव्हळ यांच्या मदतीला आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.