Bhosari Fire : भोसरी एमआयडीसी मधील कंपनीत भीषण आग

एमपीसी न्यूज : भोसरी एमआयडीसी मधील कंपनीत आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या (Bhosari Fire) पिंपरी मुख्यालयाने दिली आहे. सहा अग्निशमन बंब व दोन टँकर यांच्या मदतीने अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे.

भोसरी एमआयडीसी मधील कंपनीत आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मुख्यालयाने या आगीची वर्दी पुढील कारवाईसाठी भोसरी अनिशमन केंद्राकडे पाठविली होती.(Bhosari Fire) या घटनेची आधिक माहिती देताना, भोसरी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, केमिस्ट मेम्ब्रेन प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर 309 ए, सेक्टर 7, साळुंके वजन काटा जवळ भोसरी एमआयडीसी पुणे येथे आग लागली आहे. आगीची वर्दी मिळाल्यावर लगेच केंद्रातून संध्याकाळी 4.47 वा. अग्निशमन बंब घटनास्थळी पाठविण्यात आले होते.

Eknath Pawar : सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश – एकनाथ पवार

सहा अग्निशमन बंब व दोन टँकर यांच्या मदतीने अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती. त्यामुळे अग्निशमन बंब 7.30 वा भोसरी केंद्रात परत आले. पण परत केंद्रात फोन आला की आग परत लागलेली आहे. त्यामुळे परत 7.32 वा कंपनीकडे जाण्यासाठी रवाना झाले.(Bhosari Fire) तिथे जाऊन त्यांनी परत आग विझवली. आग विझवून अग्निशमन बंब 8.30 वा. भोसरी केंद्रात परत आले. अंदाजे शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी. लाकडी पार्टिशन, 125 मशीन्स, स्पेअर पार्ट केबल्स इत्यादी आगीत जळाले आहेत. कंपनीचे व्यवस्थापक महेश वाघ यांनी सांगितले की व्यवस्थापक की आगीमुळे अंदाजे चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.