Bhosari missing cases : भोसरी पोलिसांनी हरवलेल्या 464 व्यक्तींचा एक वर्षाच्या आत लावला शोध

एमपीसी न्यूज : हरवलेल्या 464 व्यक्तीचा व्यक्तींचा एका वर्षाच्या आत शोध लावून (Bhosari missing cases) त्यांना सुखरूप घरी पोहचविणाऱ्या भोसरी पोलिसांचे नागरिकांनी कौतुक करत आभार मानले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस तपासावरील हरवलेले, बेपत्ता असलेले पुरुष, महिला, लहान मुले यांचा तात्काळ शोध लागावा यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस ठाणे स्तरावर विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली भोसरी पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष शोध पथक तयार करण्यात आले. या पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव यांनी भोसरी पोलीस स्टेशन येथे अभिलेखावरील मागील 27 वर्षांतील बेपत्ता व्यक्तींचा तांत्रीक विश्लेषणाव्दारे एक वर्षाच्या आत  एकुण 309 हरवलेले तसेच बेपत्ता असलेले पुरुष, महिला, लहान मुले यांचा यशस्वी शोध घेतलेला आहे.

Talegaon-Dabhade : वन्यजीव सप्ताहानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात प्रशिक्षण शिबीर

तसेच 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये मिसींग ड्राईव्ह आयोजित करून भोसरी पोलीस स्टेशनकडील एकूण 40 पोलीस अंमलदारांनी 200 पैकी 155 मिसींग व्यक्तींचा शोध लावून त्यांना त्यांचे कुटुंबियाकडे सुखरूप सुपूर्द केले. अशा प्रकारे भोसरी पोलिसांनी 464 हरवलेल्या व्यक्तींचा शोध लावला आहे. (Bhosari missing cases) त्यांच्या या कामगिरीचे हरवलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून भरभरून कौतुक करण्यात आले व त्यांचे आभार देखील मानण्यात आले.

ही कारवाई भोसरी पोलीस ठाण्याचे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. यामध्ये तांत्रिक विश्लेषणाकरिता चिंचवड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार जामदाडे यांनी विशेष मदत केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.