Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्याकडे वाहतूक नियोजनाची दूरदृष्टी -रामकृष्ण पांचाळ

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी भोसरी परिसरात दूरदृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यामुळे भोसरी परिसरात नित्याची बाब ठरलेली वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. अशी प्रतिक्रिया भोसरी येथील नागरिक रामकृष्ण पांचाळ यांनी दिली.

रामकृष्ण पांचाळ म्हणाले, शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाहतूक नियोजन सक्षम करणे काळाची गरज आहे. 2014 मध्ये याबाबत आमदार महेश लांडगे यांनी जनतेला वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख चौकांत वाहतूक नियंत्रक दिवे बसवण्याची यशस्वी पाठपुरावा केला.

तसेच, भोसरी मतदारसंघातील 27 ठिकाणी नो पार्किंग झोन, अवजड वाहनांना बंदी, पदपथांवरील अतिक्रण कारवाई, पी-1, पी-2 पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियंत्रणासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. मागील अनेक वर्षांपासून वाहतूक समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत होता. यावर मात करण्यासाठी व नागरिकांच्या समस्या वाहतूक प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत, असेही पांचाळ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.