Bhosari : अपंगांच्या मदतीसाठी आमदार महेश लांडगे आग्रही; संगिता जोशी-काळभोर यांचे मत

एमपीसी न्यूज – दिव्यांग नागरिकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना सक्रियपणे राबविल्या जात नाहीत. त्या योजनांची माहिती दिव्यांगांपर्यंत पोहोचत नाही. मागील पाच वर्षांच्या कालावधीत आमदार महेश लांडगे यांनी दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली असून त्यात त्यांना यश आले आहे. अजूनही त्यांचा दिव्यांगांच्या काही बाबतीत पाठपुरावा सुरु आहे, असे मत घरकुल अपंग सहाय्य संस्थेच्या अध्यक्षा संगिता जोशी – काळभोर यांनी व्यक्त केले.

संगिता जोशी – काळभोर म्हणाल्या, “भोसरी विधानसभा मतदार संघातील दिव्यांग नागरिकांसाठी शासनाच्या कल्याणकारी योजना अथवा त्यांच्या हितासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नव्हती. दिव्यांगांसाठी असलेली पेन्शन योजना, मानधन योजना, रेशन योजना आणि अन्य अनेक योजना दिव्यांग नागरिकांपर्यंत पोहोचल्याच नव्हत्या. समाजातील दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

भोसरी परिसरासह पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिकांना मदत करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून खास कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी भोसरी आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक दिव्यांग नागरिक, महिला उपस्थित होते. फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘समाजरत्न’ पुरस्कार प्राप्त दीपा मलिक यांनी दिव्यांग नागरिकांना ‘मोटिव्हेशनल ट्रेनिंग’ दिले. दिव्यांग असतानाही आपण आनंदी जीवन कसे जगायला हवे? याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. दिव्यांगांना रेशन मिळण्याची देखील शासनाची विशेष योजना आहे. त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली असून त्याचा 83 दिव्यांगांना लाभ मिळाला आहे. याचा पाठपुरावा आमदार महेश लांडगे यांनीच केला असल्याचे संगिता यांनी नमूद केले.

संजय गांधी निराधार योजनेतून पूर्वी 600 रुपये इतके मानधन प्रतिमाह मिळत होते. राज्य सरकारकडे वेळोवेळी मागणी करुन आमदार महेश लांडगे यांनी ही रक्कम एक हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दिव्यांगांना दोन हजार रुपयांचे मानधन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांचा लाभ तात्काळ लाभार्थींपर्यंत मिळावा, यासाठी आमदार महेश लांडगे कायम आग्रही असल्याचेही संगिता यांनी सांगितले.

व्हिडीओ –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.