Bhosari: आमदार महेश लांडगे देणार 10 हजार गरजू कुटुंबांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी देशभरात केंद्र सरकारच्या वतीने लॉकडाऊन लागू करण्यात आला त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यावर तोडगा काढत आमदार महेश लांडगे यांनी ‘पुन्हा एक हात मदतीचा’या उपक्रमांतर्गत पिंपरी- चिंचवडमधील 10 हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा  करण्याचा निर्धार केला आहे.
त्यामुळे नागरिकांनी शक्य तेवढी गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तांदूळ, डाळ, तेल, गव्हाचे पीठ, मीठ-मसाले असे या मदतीचे स्वरुप असणार आहे.
आतापर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गरजू नागरिकांना मदत करीतच आहोत. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या सहकार्याने आम्ही शहरातील 10 हजार कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने आमची ‘टीम’कामाला लागली आहे. मात्र, नागरिकांनीसुद्धा सहकार्य केल्यास आम्हाला अधिकाधिक कुटुंबांना मदत देता येईल. त्यासाठी ‘पुन्हा एक हात मदती’चा उपक्रम आम्ही सुरू केला आहे.

सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता त्यावेळी आम्ही ‘एक हात मदतीचा’असे आवाहन केले होते. आता ‘पुन्हा एक हात मदतीचा’ अशी विनंती आम्ही नागरिकांना करीत असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू किराणा स्वरुपात मदत म्हणून द्याव्यात. मदत करण्यासाठी डॉ. निलेश लोंढे – 9881572395, संजय पटनी – 9822217163 आणि विनय रावळ – 9689917031 यांंना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मागील तीन दिवसांपासून पुन्हा शहरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.