Bhosari : 77 हजार मतांनी आमदार महेश लांडगे विजयी

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे 77 हजार 577 मतांनी विजयी झाले. महेश लांडगे यांना 1 लाख 59 हजार 305 तर विलास लांडे यांना 81 हजार 728 मते मिळाली. आमदार महेश लांडगे यांनी पहिल्या फेरीपासून मताधिक्याचा आलेख चढताच ठेवला. विलास लांडे यांना मिळालेल्या मतांएवढे मताधिक्य महेश लांडगे यांना मिळाले. 77 हजार 577 एवढे लांडगे यांना मताधिक्य मिळाले.

भोसरी विधानसभा मतमोजणीच्या एकूण 22 फे-या झाल्या. बावीसाव्या फेरीअंती महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांना 1 लाख 59 हजार 20 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना 81 हजार 543 मते मिळाली. पोस्टल मतदानात महेश लांडगे यांना 285 तर विलास लांडे यांना 185 मते मिळाली. प्रत्येक फेरीत महेश लांडगे आघाडीवर राहिले.

सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी 12 वाजल्यापासून जल्लोषाला सुरुवात केली. भंडा-याची मुक्त उधळण करत विजयाचा जल्लोष करण्यात आला. श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलाच्या बाहेर आमदार महेश लांडगे येताच तिथे थांबलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जयघोष केला. त्यावेळी पैलवान असलेल्या लांडगे यांनी शड्डू ठोकून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

फेरीनिहाय मताधिक्य (कंसात मताधिक्य) –
पहिली फेरी:
महेश लांडगे – 8 हजार 481 (4 हजार 387)
विलास लांडे – 4 हजार 94

दुसरी फेरी:
महेश लांडगे – 17 हजार 953 (10 हजार 18)
विलास लांडे – 7 हजार 971

तिसरी फेरी:
महेश लांडगे – 25 हजार 496 (12 हजार 719)
विलास लांडे – 12 हजार 777

चौथी फेरी :
महेश लांडगे – 32 हजार 286 (14 हजार 704)
विलास लांडे – 17 हजार 582

पाचवी फेरी:
महेश लांडगे – 39 हजार 106 (17 हजार 325)
विलास लांडे – 21 हजार 781

सहावी फेरी:
महेश लांडगे – 46 हजार 851 (25 हजार 472)
विलास लांडे – 25 हजार 472

सातवी फेरी:
महेश लांडगे – 55 हजार 970 (26 हजार 215)
विलास लांडे – 29 हजार 755

आठवी फेरी:
महेश लांडगे – 64 हजार 535 (30 हजार 744)
विलास लांडे – 33 हजार 791

नववी फेरी:
महेश लांडगे – 69 हजार 873 (32 हजार 508)
विलास लांडे – 37 हजार 365

दहावी फेरी:
महेश लांडगे – 76 हजार 9 (35 हजार 054)
विलास लांडे – 40 हजार 955

_MPC_DIR_MPU_II

अकरावी फेरी:
महेश लांडगे – 84 हजार 95 (39 हजार 470)
विलास लांडे – 44 हजार 625

बारावी फेरी :
महेश लांडगे – 92 हजार 261 (43 हजार 585)
विलास लांडे – 48 हजार 676

तेरावी फेरी:
महेश लांडगे – 97 हजार 939 (45 हजार 195)
विलास लांडे – 52 हजार 744

चौदावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 6 हजार 126 (48 हजार 577)
विलास लांडे – 57 हजार 549

पंधरावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 16 हजार 311 (55 हजार 227)
विलास लांडे – 61 हजार 34

सोळावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 23 हजार 822 (59 हजार 750)
विलास लांडे – 64 हजार 72

सतरावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 28 हजार 246 (60 हजार 361)
विलास लांडे – 67 हजार 859

अठरावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 35 हजार 966 (64 हजार 862)
विलास लांडे – 71 हजार 104

एकोणीसावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 44 हजार 344 (68 हजार 936)
विलास लांडे – 75 हजार 408

विसावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 53 हजार 38 (73 हजार 608)
विलास लांडे – 79 हजार 430

एकविसावी फेरी:
महेश लांडगे – 1 लाख 58 हजार 623 (77 हजार 279)
विलास लांडे – 81 हजार 344

बावीसावी फेरी :
महेश लांडगे – 1 लाख 59 हजार 20 (77 हजार 477)
विलास लांडे – 81 हजार 543

टपाली मतदान :
महेश लांडगे – 285
विलास लांडे – 185

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.