Bhosari : शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी घेतला वसा

एमपीसी न्यूज –  लोकसभा निवडणुकीसाठी केवळ दीड दिवस बाकी आहेत. या दीड दिवसांत प्रत्येक नगरसेवकांनी मतदारांना भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विकासकामे पटवून द्यावी.  घरा-घरांत प्रचार करा  अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत झालेल्या बैठकीत नगरसेवकांना दिल्या.

भोसरीत झालेल्या या बैठकीत सर्व नगरसेवक उपस्थित  होते. भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मागील पाच वर्षाचत उत्तम काम केले आहे. संसदेत त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. मतदारसंघात विकासाची कामे केली आहे. आपली कामे झाली पाहिजेत. यासाठी सर्वांनी  उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे.  सगळीकडे प्रचाराची पत्रके वाटण्यात यावेत.  घरा-घरांत  जाऊन प्रचार करावा. कोणीही गाफील राहू नये.

मतदानाच्या आदल्या दिवसांपर्यंत सतर्क राहून प्रचार करण्यात यावा. शिवाजीराव आढळराव पाटील जनतेशी एकरुप असणारे खासदारांना पुन्हा चौकार मारण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. यांच्या प्रचारार्थ ही बैठक आयोजित केली होती. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे ही उपस्थित होते.

महेश लांडगे पुढे म्हणाले की,  प्रत्येकाने  पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घ्याव्यात.  प्रचाराच्या पदयात्रा काढून मतदारांना विविध मार्गाने आकर्षित करा. शिरुरचा विकास शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामुळे झाला आहे. त्यांच्या विकासकामे घराघरात पोहोचवा. राहिेला आहे फक्त दीड दिवस. या दीड दिवसात प्रचार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कसोशीने  प्रयत्न करा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.