Bhosari : सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे टोळीवर मोक्का

Mocca on Dnyaneshwar Landage gang; आरोपी आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करत होते

एमपीसी न्यूज – भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (सोमवारी) दिले आहेत.

ज्ञानेश्वर रामदास लांडगे (वय 25, रा. गवळी माथा, भोसरी), गणेश तिम्मा धोत्रे (वय 27, रा. श्रीकृष्ण मंदिराशेजारी, गवळीमाथा, टेल्कोरोड, भोसरी), मल्लेश चन्नेश कोळवी (वय 21, रा. एकता हौसिंग सोसायटी, टॉवर लाईन, चिखली), कृष्णा विक्रम शिदे (वय 28, रा. आदिनाथनगर, भोसरी) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांनी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्फत एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्ञानेश्वर लांडगे याच्यावर मोक्काची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव तयार केला होता.

त्या प्रस्तावाला मंजुरी देत पोलीस आयुक्तांनी ज्ञानेश्वर लांडगे टोळीवर मोक्काची कारवाई करण्याचे आदेश दिले.

आरोपी स्वतःच्या वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करत होते. त्यामुळे या टोळी विरूध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यापूर्वी पोलीस आयुक्तांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

हा प्रस्ताव मंजूर करून पोलीस आयुक्तांनी सोनवरी (दि. 20) ज्ञानेश्वर लांडगे या गुन्हेगारी टोळीविरुध्द मोका कायद्यान्वये दोषारोपपत्र दाखल करण्याबाबत आदेश दिले आहेत.

कुप्रसिद्ध गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध

कुप्रसिध्द गुन्हेगार अक्षय दिलीप भोसले (वय 22, रा. पापडगल्ली, पवनानगर, काळेवाडी, पुणे) याने वाकड व पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दित सन 2016 पासून आत्तापर्यंत 5 गंभीर गुन्हे केलेले आहेत.

त्याच्या गुन्हयांचा चढता आलेख पाहून तसेच पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी त्याचेवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता.

या प्रस्तावाला पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली असून आरोपी अक्षय याला 16 जुलै रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.