Bhosari : मुलींच्या हॉस्टेलमधील तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातील मुलींच्या हॉस्टेलमध्ये घुसून एकाने तरुणीचा विनयभंग केला. मंगळवारी (दि.2) रात्री दहाच्या सुमारास भोसरीतील एका नर्सिंग हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला.

या प्रकरणी एका 27 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश जाधव याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरुणी ही भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नर्सिंग प्रशिक्षण केंद्रात शिकत असून तेथील हॉस्टेलमध्ये राहते. मंगळवारी रात्री आरोपी गणेश हा हॉस्टेलमध्ये घुसला. फिर्यादी या जेवण करून जात असताना तिला अडवले. टेरेसजवळ जाऊन बोलूया असे म्हणत लगट करण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी यांनी प्रतिकार केला असता तिचा गळा दाबला व बघून घेतो अशी धमकी देत पळ काढला. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.