Bhosari : दापोडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

molestation of a minor girl at Dapodi : आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, पोक्सो कायदा कलम 7, 8 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत एका नराधमाने तिच्याशी गैरकृत्य करत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास लिंबारे वस्ती, दापोडी येथे घडली.

जितेंद्र कलीराम चंडालिया (वय 35, रा. लिंबारे वस्ती, दापोडी) असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीच्या तोंडात फोड आला होता. त्यामुळे मुलगी घरात आराम करत होती. रविवारी रात्री आठच्या सुमारास पीडित मुलीची आई वाॅशरूम मध्ये गेली.

त्यावेळी घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने घरात प्रवेश केला. आरोपीने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला.

याबाबत आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, पोक्सो कायदा कलम 7, 8 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.