Bhosari : पतीच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग

दीड लाख रुपये घेऊन मित्र फरार

एमपीसी न्यूज – पतीने दीड लाख रुपये घेऊन बाहेर बोलावले आहे, असे सांगून महिलेला एका लॉजवर नेऊन तिचा विनयभंग केला. तसेच तिने आणलेले दीड लाख रुपये घेऊन पळून गेला. हा प्रकार 17 ते 25 जानेवारी 2019 या कालावधीत मॅगझीन चौक दिघी येथे घडला.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गोकुळ गिरी (रा. नांदेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. त्याने 17 जानेवारी रोजी महिलेला फोनकरून सांगितले की, तिच्या पतीने दीड लाख रुपये घेऊन दिघी मधील मॅगझीन चौकात बोलावले आहे. त्यानुसार पीडित महिला घरातील दीड लाख रुपये घेऊन मॅगझीन चौकात गेली.

आरोपीने तिला तिथल्या एका लॉजवर नेले. तिथे तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच महिलेने आणलेले दीड लाख रुपये जबरदस्तीने घेऊन पळून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.