Bhosari : सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच ओळखीचा गैरफायदा घेत मुलीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केली. या प्रकरणी मंगळवारी (दि.२६) एमआयडीसी भोसरी पोलीस या ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी पीडितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार देवा महादेव जमादार (वय २२, रा, भैरवनाथ मंदिराजवळ, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी देवा हा वाहनचालक आहे. त्याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन बहिणीचा वारंवार पाठलाग करून ओळख केली. तसेच तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून आईलाही धमकी दिली. त्यानंतर तिचे एकांतातील फोटो यु ट्यूबवर टाकले. व तिलाही अश्लील व्हिडीओ पाठवले. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. याबाबत फियादी यांना समजले असता त्यांनी तक्रार दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश नांदुरकर अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.