Bhosari : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- क्‍लासमध्ये आलेल्या महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना भोसरी येथे घडली.

रवी गणेश उतपुरे (वय 21, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 27 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 8) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला या गवळीनगर, भोसरी येथे क्‍लासमध्ये आल्या होत्या. त्यावेळी आरोपी याने फिर्यादी महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्यांनी नकार दिला असता आरोपीने त्यांचा हात पकडत विनयभंग केला. फिर्यादी या क्‍लासच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीने दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या महिलेची तीन बोटे दरवाजात अडकून जखमी झाली.

तसेच आरोपीने त्यांच्या गळ्यावर ओरबडले. त्यावेळी फिर्यादी यांनी आरडा ओरडा केल्याने आरोपीने त्यांना सोडून दिले. तसेच माझ्याशी लग्न न केल्यास तुझ्या आई वडिलांना जीवे मारून टाकेन, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक हंडाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.