BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari: बसचालकाला मारहाण; मोटारचालकावर गुन्हा दाखल

0 484
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – ‘तू, तुझी एसटी बस पुढे का जाऊ दिली नाही, मला पुढे जायचे होते, असे म्हणत बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना भोसरी येथे घडली.

.

अभिजित रमाकांत बोराटे (रा. बोराटे वस्ती, मोशी) असे अटक केलेल्या आरोपी मोटारचालकाचे नाव आहे. याबाबत बसचालक सिद्धेश्‍वर मधुकर आघाव (वय 34, रा. नारायणगाव डेपो) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आघाव हे राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर चालक आहे. मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास ते एसटीबस घेऊन चालले होते.

पुणे-नाशिक महामार्गावरील पंपासमोर आले असता आरोपी बोराटे याने एसटी बसला मोटार आडवी लावली. ‘तू तुझी एसटी बस पुढे का जाऊ दिली नाही, मला पुढे जायचे होते, असे म्हणत एसटी चालकाला मारहाण केली. भोसरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: