BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी मुकुंद आवटे

सचिवपदी चंद्रकांत सोनटक्के, खजिनदारपदी प्रा. दिगंबर ढोकले

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी मुकुंद आवटे यांची निवड करण्यात आली आहे. तर, सचिवपदी चंद्रकांत सोनटक्के, उपाध्यक्षपदी अरुण इंगळे आणि खजिनदारपदी प्रा. दिगंबर ढोकले यांची नियुक्ती झाली आहे. माजी प्रांतपाल लायन गिरीश मालपाणी यांनी नवीन पदाधिका-यांना पदाची शपथ दिली.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात शनिवारी (दि. 20)सन 2019-20 या वर्षासाठीच्या पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी कवी नारायण पुरी, मावळते अध्यक्ष सुदाम भोरे, वेदांताचार्य डॉ. नारायण महाराज, मुरलीधर साठे, पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. अनु गायकवाड, डॉ. विलास साबळे, डॉ. शंकर गायकवाड, श्रीकृष्ण आत्तारकर, अनिल कातळे, नागेश वसतकर आदी उपस्थित होते.

मालपाणी म्हणाले, ‘लायन्स क्लबच्या माध्यमातून जगभर सेवाकार्ये सुरु असते. समाजासाठी त्याग आणि सेवा केल्यानंतर मिळणारा आनंद हीच खरी आयुष्याची कमाई असते’. वेदांताचार्य डॉ. नारायण महाराज यांनी सेवा हाच परम धर्म असल्याचे सांगून करत असलेल्या कार्याला अध्यात्मिक बैठक असल्याने आंनद व्यक्त केला. कवी नारायण पुरी यांनी ग्रामीण ढंगातील कविता सादर करुन कार्यक्रमात रंग भरले.

यावेळी गरजू मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, वारक-यांना आरोग्यासाठी मदत, स्कूलबग आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच)सेवा देणारे एम.ए.हुसेन यांनाही आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले, डॉ. शंकर गायकवाड यांनी केले. नागेश वसतकर यांनी आभार मानले.

 

Advertisement

HB_POST_END_FTR-A3