Bhosari: पालिका रुग्णालयातील वॉर्डबॉय पॉझिटीव्ह; डॉक्टर, नर्ससह 15 जण ‘क्वारंटाईन’

Municipal Hospital Wardboy Positive; 15 quarantine doctors, nurses

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील जुन्या रुग्णालयातील एका वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या केबीनसमोर वॉर्डबॉयची ड्युटी होती. त्यामुळे वॉर्डबॉयच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील पाच जणांचे नमुने तत्काळ तपासणीसाठी पाठविले आहेत. डॉक्टर, नर्ससह 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर, दोन डॉक्टरांचीही तपासणी केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाविरोधात लढणा-या कर्मचा-यांनाही कोरोनाची लागण होत आहे.

भोसरीतील जुन्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वॉर्डबॉयला त्रास होत होता. त्यामुळे त्याची कोरोनाची तपासणी करण्यात आली.  शुक्रवारी रात्री त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा  55 वर्षीय वॉर्डबॉय भोसरीतीलच रहिवाशी आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांच्या केबीनसमोर त्याची ड्युटी होती. त्यामुळे वॉर्डबॉयच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील पाच जणांचे नमुने तत्काळ तपासणीसाठी पाठविले आहेत. डॉक्टर, नर्ससह 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर, दोन डॉक्टरांचीही तपासणी केली जाणार आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”भोसरी रुग्णालयातील वॉर्डबॉयचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. रात्री त्याचे रिपोर्ट आले. त्यामुळे त्याच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील पाच जणांचे नमुने तत्काळ तपासणीसाठी पाठविले आहेत. 15 लोकांना होम क्वारंटाईन केले आहे. यामध्ये दोन डॉक्टर, नर्स आहेत.  त्यांनाही होम क्वारंटाईन करुन त्यांचीही तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वॉर्डबॉयची संख्या जास्त आहे. आणखीन काही संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.