Bhosari : आर्थिक विवंचनेतून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज, मंगळवारी (दि. 14) भोसरी येथील शास्त्री चौक परिसरात उघडकीस आला आहे.

प्रियंका देशमुख (रा. शास्त्री चौक, भोसरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर निलेश देशमुख असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती निलेश आणि मयत पत्नी प्रियंका यांना सात वर्षाची मुलगी आहे. भोसरी मधील शास्त्री चौकात हे कुटुंब राहत आहे. निलेश याने पत्नी प्रियंकाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे.

 

Bhosari : आर्थिक विवंचनेतून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

Bhosari : आर्थिक विवंचनेतून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.