Bhosari News : झोपडपट्टी धारकांना बेघर करू नका छावा ब्रिगेडची मागणी

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी भागातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण नाही. झोपडपट्टी असेल तिथे पुनर्वसन कायदा नुसार झोपडपट्टीधारकांना न्याय द्यावा. तोपर्यंत नागरिकांना बेघर करू नये. असे मत छावा ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष अभय भोर यांनी मंगळवार (दि. 30) रोजी प्रसिध्दी पत्राद्वारे व्यक्त केले.

एमआयडीसी परिसरातील शेकडो झोपडपट्टीधारकांची बैठक भोर यांच्या कार्यालयात संपन्न झाली. गेली तीस-पस्तीस वर्षे वास्तव्यास असून देखील आजही त्यांची नोंद कुठेही करण्यात आलेली नाही. एमआयडीसी परिसरात अनेक शासकीय कामे चालतात. या कामावर बहुतांश मजूर काम करतात. मात्र या मजुरांच्या झोपड्यांवर बुलडोजर फीरविण्याच्या धमक्या महापालिका आणि पोलीस यंत्रणेकडून मिळत आहे. सर्व मजूर अशिक्षित असल्याने त्यांना नियम आणि शासकीय योजनांची माहिती नाही. त्यांच्या लहान मुलांना वस्ती वरच शिकविले जात आहे. एमआयडीसी परिसरात गेली तीस ते पस्तीस वर्ष अनेक झोपड्या वसलेल्या आहेत. आज बेकारीच्या काळात या झोपड्या काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. परंतु आजही या झोपड्यांचे पालिकेत सर्वेक्षण करण्यात आलेले नाही किंवा त्यांना फोटोपास देखील दिला नाही.

त्यामुळे कायद्याच्या कक्षेत हे नागरिक बसू शकत नाहीत परंतु गेली कित्येक वर्ष ते याठिकाणी असल्याचा पुरावा नागरिकांकडे आहे. तरीही झोपडपट्टी धारकांना कोणत्याही मूलभूत सुविधांचा लाभ शासनाकडून अथवा नगरपालिकेकडून मिळत नसल्याचे दिसून येते.
या प्रसिध्दीपत्रात त्यांनी येथील झोपडपट्टी धारकांचे सर्वेक्षण का केले नाही, याची चौकशी करण्याची मागणी व पुनर्वसनासाठी मुदत देण्याची मागणी शासनाला करणार असल्याचे सांगीतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.