Bhosari News : इंद्रायणीनगर येथे 2.40 लाखाची घरफोडी ; रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – इंद्रायणीनगर, भोसरी येथे 2.40 लाखाची घरफोडी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच CCTV चा DVR व WIFI चा राऊटर चोरी केला आहे. बुधवारी (दि.12) सेक्टर नं 01, फ्लॅट नं एफ 38/11, इंद्रायणीनगर, भोसरी येथे ही घटना घडली.

बाळु पिलाजी लांडे (वय 47, रा. सेक्टर नं 01, फ्लॅट नं एफ 38/11, इंद्रायणीनगर, भोसरी ) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, CCTV चा DVR व WIFI चा राऊटर असा एकूण 2 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे. असे फिर्यादीत नमूद केले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.