Bhosari News : दोन दिवसीय रक्तदान शिबिरात 234 जणांनी केले रक्तदान

0

एमपीसी न्यूज – कलाल समाज, विदर्भ मित्र मंडळ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सुवर्णयुग मित्र मंडळाच्या वतीने दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 234 जणांनी रक्तदान केले.

एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने इंद्रायणी नगर येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये 59 जणांनी रक्तदान केले. याच दिवशी सुवर्णयुग मित्र मंडळाच्या वतीने पोलीस लाईन येथे आयोजित शिबिरात 115 जणांनी रक्तदान केले. दोन्ही शिबिरांचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे मुख्य पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, नगरसेविका नम्रता लोंढे,  वरिष्ठ पोलीस अधिकारी तांगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, कलाल समाज व विदर्भ मित्र मंडळच्या वतीने दोन मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये 62 लोकांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक देऊन आभार मानले. राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या शिबिरांचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment