Bhosari Crime News : टेलिग्राम वरून पावणे तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – टेलीग्रामवर फसव्या पेजच्या माध्यमातून पैसे (Bhosari Crime News) कमावण्याच्या बहाण्याने महिलेची 2 लाख 85 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार कासारवाडी येथे उघडकीस आला. हा प्रकार 3 ते 16 मार्च या कालावधीत घडला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेलिग्राम वरील अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Nigdi News : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना टेलिग्रामवरील फसव्या वेब पेजच्या माध्यमातून ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास आकर्षक पैसे कमावण्याचा विश्वास आरोपींनी दाखवला. त्यातून फिर्यादीकडून 2 लाख 85 हजार रुपये घेऊन त्यांना कोणताही परतावा न देता तसेच गुंतवलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत (Bhosari Crime News)  म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.