Bhosari News : बनावट नोटा एटीएममध्ये भरल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बनावट नोटा बँकेच्या रिसायकल मशीन एटीएम मध्ये भरल्या प्रकरणी एका खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी लांडेवाडी भोसरी येथील टीजेएसबी सहकारी बँक येथे घडली.

शेख फैसल ईब्राअहमद (रा. वास्तुउद्योग हाउसिंग सोसायटी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या खातेदाराचे नाव आहे. याबाबत टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे चिफ मॅनेजर संतोष काळे यांनी बुधवारी (दि. 8) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडेवाडी भोसरी येथे टीजेएसबी सहकारी बँकेच्या शाखेत रिसायकल मशीन एटीएम आहे. आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास आरोपीने दोनशे रुपये किमतीच्या पाच बनावट नोटा मशीन द्वारे त्याच्या खात्यावर जमा केल्या. हा प्रकार बँकेच्या निदर्शनास आला असल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.