Bhosari News: नवीन भोसरी रुग्णालयात अद्यावत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत सर्व्हे क्रमांक 1 येथे उभारण्यात आलेल्या नवीन भोसरी रुग्णालयाच्या तळमजल्यावर ग्रंथालयासाठी आरक्षित असणा-या जागेत अद्यावत वैद्यकीय संदर्भ ग्रंथालय उभारण्यात येणार आहे.

भोसरी येथील उभारण्यात येणा-या वैद्यकीय संदर्भ ग्रंथालयाचा उपयोग शहरातील 3500 हुन जास्त डॉक्टरांना होणार आहे. या ग्रंथालयात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित संदर्भ ग्रंथ, संशोधन ग्रंथ, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द होणारी वैद्यकीय क्षेत्रातील मासिके, प्रबंध, नामवंत डॉक्टर व संशोधकांचे नवनविन ग्रंथ याठिकाणी नविन डॉक्टरांना अभ्यासता येणार आहे.

सर्वच क्षेत्रात संगणकीकरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात देखील रोबोट सर्जरीचे प्रमाण सर्वच सर्जरीसाठी रुग्णांना वरदान ठरत आहे. हे विकसित होणारे तंत्रज्ञान याविषयीची सखोल अद्यावत माहितीचे संदर्भ ग्रंथ देखील येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.