Bhosari news: भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी अरुण इंगळे; वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प

वर्षभर 'SARITA' या तत्वानुसार सेवाकार्ये करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष इंगळे यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी अरुण इंगळे यांची निवड झाली आहे
2020-21 या वर्षाचा पदग्रहण व शपथविधी सोहळा रविवार (दि.३०) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षपदाची सूत्रे अरुण इंगळे यांनी मावळते अध्यक्ष मुकुंद आवटे यांच्याकडून स्वीकारली.

माजी प्रांतपाल आणि जीएलटी कोऑर्डीनेटर राज मुछाल यांच्या विशेष उपस्थितीत पदग्रहन सोहळा पार पडला. दरम्यान, वर्षभर ‘SARITA’ या तत्वानुसार सेवाकार्ये करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष इंगळे यांनी सांगितले.

लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्डच्या विविध पदाधिका-यांनी देखील यावेळी शपथ घेतली. त्यामध्ये सचिवपदी जीवन सोमवंशी, खजिनदारपदी डॉ. अनु गायकवाड, प्रथम उपाध्यक्षपदी डॉ. शंकर गायकवाड, द्वितीय उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण अत्तरकर, तृतीय उपाध्यक्षपदी नागेश वसतकर, सहसचिव म्हणून विठ्ठल वाळुंज, सहखजिनदार म्हणून डॉ. दीपाली कुलकर्णी, टेमर म्हणून जयश्री साठे, टेलट्विस्टर म्हणून किरण आवटे, मेंबरशिप कमिटी चेअरमन मुरलीधर साठे, जनसंपर्क अधिकारी सुदाम भोरे, जी. एम. टी. समन्वयक डॉ. प्रशांत गदिया, जी. एल. टी. समन्वयक डॉ. रोहिदास आल्हाट,  जी. एस. टी. समन्वयक प्रा. दिगंबर ढोकले, ॲक्टिव्हिटी चेअरमन नंदा फुगे यांनी शपथ घेतली.

तसेच संचालक म्हणून डॉ. विलास साबळे, प्रा. शंकर देवरे, श्रीकृष्ण वावगे, अनिल कातळे, योगेश भोंगाळे, विठ्ठल खेसे, पुरुषोत्तम बो-हाडे, राजेश भड, पुरुषोत्तम सदाफुले, संगीता इंगळे, मुरलीधर जावक आणि महादेव फुलारी यांनी शपथ घेतली.

तसेच मागील वर्षी पदभार सांभाळलेल्या सर्व सदस्यांना डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम लिखित अग्निपंख या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.

ला. अभय शास्त्री यांनी आखून दिलेल्या ‘SARITA’ या तत्वानुसार सेवाकार्ये करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष अरुण इंगळे यांनी सांगितले. SARITA या शब्दातील प्रत्येक अक्षराला महत्व असून त्यानुसारच सेवाकार्ये करण्यात येईल.

यातील S म्हणजे स्वच्छता नदीची या अंतर्गत इंद्रायणी नदीची स्वच्छता करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

लायन्स क्लबतर्फे इंद्रायणी नदीच्या काठावर नदी स्वच्छतेचे आवाहन करणारे फलक लावण्यात येणार आहेत. या कार्याची जबाबदारी रिजन चेअरमन सुरलीधर साठे व प्रा. दिगंबर ढोकले यांनी घेतली आहे.

A म्हणजे ADOPT GIRL CHILD या अंतर्गत प्रा. शंकर देवरे, डॉ. अनु गायकवाड आणि डॉ. आल्हाट हे गरजू आणि गरीब विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक मदत करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

R म्हणजे ROTI BANK या तत्वानुसार स्नेहवन आणि पांजरपोळ येथील अंधशाळा आणि गुरुकुलम चिंचवड येथील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्याची जबाबदारी माजी अध्यक्ष मुकुंद आवटे व विद्यमान अध्यक्ष अरुण इंगळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

I म्हणजे I AM A CORONA WORRIOR यानुसार सध्याच्या काळात कोरोना विरुद्धच्या लढ्यात सैनिक म्हणून कार्यरत असणा-या डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस यांचा सन्मान करण्यात येणार आहे. T म्हणजे TEACH VALUE यानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी मूल्ये रुजवण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, काव्य स्पर्धा घेण्याची जबाबदारी पुरुषोत्तम सदाफुले, सुदाम भोरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

A म्हणजे  AFORESTATION नुसार वृक्षलागवड आणि लावलेले वृक्षसंगोपन करण्याची जबाबदारी डॉ. शंकर गायकवाड, श्रीकृष्ण अत्तरकर, डॉ. दीपाली कुलकर्णी, जयश्री साठे, किरण आवटे, संगीता इंगळे यांनी स्वीकारली आहे.

याव्यतिरिक्त दरवर्षी प्रमाणे वारक-यांच्या आरोग्यासाठी वीस हजार रुपयांचा निधी वेदांताचार्य डॉ. नारायणमहाराज जाधव यांच्याकडे क्लबच्या वतीने सुपूर्त करण्यात येईल.

सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले. डॉ शंकर गायकवाड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.