Bhosari news: ‘सीएसआर’अंतर्गत महापालिकेला वैद्यकिय उपकरणांची मदत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ व ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातील भोसरी रूग्णालयाकरीता भोसरी एमआयडीसीतील फोर्सीया कंपनीच्या वतीने सीएसआर अंतर्गत वैद्यकिय उपकरणे देण्यात आली.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे व जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॅा. शैलजा भावसार यांनी कंपनीचे प्रतिनिधी जितेंद्र निखळ यांच्याकडून वैद्यकीय साहित्य स्वीकारले.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सेवाभावी संस्था व कंपन्या महापालिकेच्या या कोरोना लढाईत सहभागी होत आहेत.

फोर्सीया कंपनीच्या वतीने कोरोना रूग्णांचे तपासणीसाठी आवश्यक ॲाक्सिमीटर,थरमल गनसह विविध दहा प्रकारची वैद्यकीय उपकरणे महापालिकेकडे सूपूर्त केली.

सीएसआर अंतर्गत फोर्सीया कंपनीने केलेल्या मदतीबद्दल सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.