Bhosari News : स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी भाग्यश्री पवार यांची निवड 

एमपीसीन्यूज : स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी भाग्यश्री पवार यांची निवड करण्यात आली आहे. पवार यांनी भोसरी परिसरात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना या संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सांगळे यांनी पवार यांना नुकतेच नियुक्ती पत्र दिले. यावेळी विजया आल्हाट, अमृता जगदाळे, रिया आल्हाट, विद्या आल्हाट, रोहिणी मांढरे, गायत्री तळेकर,सामाजिक कार्यकर्ते सतीश जरे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

भाग्यश्री पवार या सन्मान सामाजिक संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात व प्रामुख्याने भोसरी परिसरात समाजोपयोगी कार्य केले आहे. यामध्ये महिलांना न्याय मिळवून देण्यामध्ये त्यांचा कायम पुढाकार असतो. महिलांचे कौंटुंबिक हिंसाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी यशस्वीरीत्या हाताला आहेत. तसेच कौटुंबिक हिंसाचार पीडित महिनांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यानं कायम अग्रेसर असतात.

स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे ही माझ्या आजपर्यंतच्या नि:स्वार्थी सामाजिक कार्याची पोहोच पावती आहे. यापुढे पदाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासासह त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवाय संघटनेची विचारधारा तळागाळात पोहोचविण्याला माझे प्राधान्य राहील. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करुन त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सदैव प्रत्नशील राहणार असल्याची ग्वाही भाग्यश्री पवार यांनी निवडीनंतर दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.