Bhosari News : भोसरीच्या वेदिकालाही हवयं 16 कोटीचं इन्जेक्शन, फक्त दोन महिनेच आहेत शिल्लक

एमपीसी न्यूज – ‘एसएमए टाईप 1’ या आजाराशी लढणाऱ्या तीरा कामत या चिमुकलीला 16 कोटी रुपये किंमतीचे ‘झोलजेन्स्मा इंजेक्शन’ काही दिवसांपूर्वी देण्यात आलं. याच आजराशी लढणा-या भोसरीतील वेदिकालाही 16 कोटीच्या त्याच इंजेक्शनची आवश्यकताआहे. वेदिकावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचे आई-वडिल क्राऊड फंडींगच्या माध्यमातून उपचारासाठी आवश्यक रक्कम गोळा करत आहेत.

भोसरीतील सौरभ शिंदे व स्नेहा शिंदे यांची आठ महिन्याची कन्या विदिका शिंदेला दुर्मिळ एसएमए टाईप 1 म्हणजेच स्पायनल मस्क्युलर अट्रोफी हा आजाराने ग्रासले आहे. या आजाराचे विविध प्रकार आहेत. त्यातला टाईप 1 हा सगळ्यात गंभीर प्रकारचा आजार आहे.

वेदिकावर पुण्यातील मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिला घरीच आयसोलेट करण्यात आले आहे. वेदिकाची काळजी घेतानाच दुसरीकडे तिच्या उपचारांसाठी लागणारे पैसे गोळा करण्यासाठी तिच्या आई वडिलांसह नातेवाईकांची धडपड सुरू आहे.

वेदिकाच्या या आजारावर उपाय म्हणजे तिच्या शरीरात नसणारं जनुक तिच्या शरीरात सोडणं. पण ही ट्रिटमेंट भारतात उपलब्ध नाही. अमेरिकेत यावरच्या झोलजेन्स्मा या जीन थेरपीला मान्यता मिळाली आहे. या इजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी एवढी आहे. जी रक्कम उभी करण्यासाठी व वेदिकाची कहाणी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तिच्या आई बाबांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. तसेच, काही स्थानिक लोकप्रतिनिधीही या चिमुकलीच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

‘मिलाप’ या क्राऊड फंडींग संकेतस्थळाच्या माध्यमातून सध्या वेदिकाच्या उपचारासाठी पैसा उभा केला जात आहे. तसेच, गुगल पे, फोन पे व इतर माध्यमातून या इंजेक्शनसाठी पैसे उभारले जात आहेत. उपचारासाठी 16 कोटी रूपयांची आवश्यकता आहे.

काही दिवसांपूर्वी तीरा कामत या चिमुकलीला देखील अशा पद्धतीने पैसे उभारून इंजेक्शन उपलब्ध केलं होतं. त्यामुळे हे शक्य आहे, असा विश्वास वेदिकाचे वडिल सौरभ शिंदे यांनी व्यक्त केला. वेदिकाच्या उपचारासाठी दानशूर व्यक्तींनी शक्य तेवढी आर्थिक मदत करवी असे भावनिक आवाहन शिंदे यांनी केलं आहे.

1) पैसे देण्यासाठी खालील लिंकचा वापर करा (अॅन्ड्रॉईड) – https://milaap.org/fundraisers/support-vedika-shinde/deeplink?deeplink_type=paytm

2) ‘गुगल पे’ साठी नंबर- 9922098885

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.