Bhosari News: अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव मोटारसायकलने धडक दिल्याने दुसऱ्या (Bhosari) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी भोसरीत घडली.

महादेव बबन कान्हुरकर (वय 42 ) असे या अपघातात मृत्यू झालेलय दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.

Maval : सदनिका धारकांना मूलभूत सुविधा नसतानाही बिल्डरांना पूर्णत्वाचा दाखला मिळतो कसा?

कान्हुरकर हे त्यांच्या दुचाकीवरून पुणे-नाशिक महामार्गावरील जय गणेश साम्राज्य चौक येथील स्पाईन रस्त्याने खडी मशीनकडे जात होते. दरम्यान, भोसरीकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने कान्हुरकर यांचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.