Bhosari News: संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाने पुन्हा एकदा रक्ताची आवश्यकता भासू लागली आहे. त्यापार्श्वभूमीवर संत निरंकारी मिशनच्या वतीने येत्या रविवारी (दि. 26) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे संत निरंकारी सत्संग भवन, दिघी रोड, ब्रँच भोसरी,पुणे येथे रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे राज्यात सातत्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. सध्या राज्यासह देशभरात ओमायक्रॉनने धडकी भरवली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाने पुन्हा एकदा रक्ताची आवश्यकता भासू लागली असताना अनेक रक्तदाते पुढे येत आहेत.

एप्रिल 2021 पासून पुणे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत संत निरंकारी मिशन तर्फे 19 रक्तदान शिबीर संपन्न झाले.1906 युनिट रक्त संकलन केले. ससून रुग्णालय रक्तपेढी, वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी, कमांड रुग्णालय रक्तपेढी, संत निरंकारी रक्तपेढी यांच्यामार्फत करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी अनेक वेळा आवश्यकतेनुसार प्लाझ्मादान करून अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवले. मागील तीस वर्षे भोसरी परिसरामध्ये संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीबरोबरच स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर यांसारख्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे.या मानवतेच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मिशनचे भोसरी प्रमुख अंगद जाधव यांनी केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.