Bhosari News: भूखंड प्रकरणाचा गुन्हा रद्द करा; एकनाथ खडसे यांची उच्च न्यायालयात याचिका

एमपीसी न्यूज – भोसरी, एमआयडीसीतील भूखंड प्रकरणाचा गुन्हा रद्द करण्यासाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले. आता पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांना भोसरी, एमआयडीसी भूखंड प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने नोटीस बजाविली होती. मात्र, खडसे यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर 15 जानेवारीला ईडीने खडसे यांची सहा तास चौकशी केली.

आता खडसे यांनी भोसरी एमआयडीसीतील भूखंड प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

याबाबतचे वृत्त मराठी दैनिकाच्या वेबपोर्टलने दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.