Bhosari News: मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा स्तुत्य उपक्रम – विलास लांडे

मोफत लसीकरणाच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पाच गवळीनगर मधील नागरिकांच्या मोफत लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

दिघीरोड येथील सिद्धेशवर हायस्कूल येथे 29 जुलैपर्यंत मिळणार टोकन

 

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीतील प्रभाग क्रमांक 5 गवळीनगरमधील सर्व नागरिकांच्या मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. कै दामोदर रामभाऊ गव्हाणे प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने, नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम होत आहे. शहरातील ही पहिलीच संकल्पना आहे. यामुळे नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचे काम गव्हाणे यांच्या माध्यमातून झाले आहे. महामारीच्या काळात हा अतिशय आवश्यक आणि स्तुत्य उपक्रम असल्याचे, मत माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केले.

कै. दामोदर रामभाऊ गव्हाणे प्रतिष्ठाण यांच्या सौजन्याने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 5 गवळीनगर, भोसरी येथे मोफत लसीकरण मोहिमेचे उदघाटन सोमवारी (दि.26) करण्यात आले. ही मोहीम 26 ते 30 जुलै 2021 या कालावधीत सुरु राहील. प्रभागातील नागरिकांचे मोफत लसीकरण हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ‘सर्वांनी मनापासून ठरवूयात, प्रत्येकाचं लसीकरण करूयात’ या दमदार घोषवाक्याने या मोहिमेचा आरंभ करण्यात आला. यावेळी लांडे बोलत होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, जितेंद्र सिंग, राजेंद्र सिंग, डॉ. माधुरी झांबरे, डॉ. प्रफुल्ल नारखडे, डॉ. दिपक शिंदे, डॉ. सचिन कोरडे, डॉ. वृशाली जाधव उपस्थित होते.

विलास लांडे म्हणाले, ”कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण अतिशय महत्वाचे आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. परंतु, लसीच्या तुटवड्यामुळे ते शक्य होत नाही. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नगरसेवक अजित गव्हाणे यांनी प्रभागातील नागरिकांचे मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण हा अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे. यामाध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. या उपक्रमाचे वॉर्डातून कौतुक होत आहे. संपूर्ण शहरात असे उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे”.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ”नेहमी समाजोपयोगी काम करायचे अशा अजित पवार यांच्या आम्हाला सूचना असतात. तोच वसा घेवून अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून मोफत लसीकरण सुरु झाले आहे. कोरोना महामारीच्या काळात हा अतिशय महत्वाचा आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. प्रभागातील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे”.

नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, ”अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 5 गवळीनगर, भोसरीतील 45 वर्षांपुढील नागरिकांसाठी मोफत ‘कोविशिल्ड’ लसीकरणाचे आयोजन केले आहे. राजकारणात काम करत असताना राजकारण निवडणुकीपुरते असले पाहिजे. उर्वरित काळात समाजाला अभिप्रेत, अपेक्षित काम केले पाहिजे अशी अजित पवार यांची शिकवण आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शहरात सर्व ठिकाणी लोकपोयोगी कार्यक्रम घेतले आहेत. दादांनी शहराला वैभव प्राप्त करुन दिले. दादांच्या माध्यमातून शहराची वेगळी ओळख झाली आहे. गवळीनगरमध्ये पाच दिवस लसीकरण मोहिम होणार आहे. दररोज दोनशे डोस दिले जाणार आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलशी टायअप केले आहे. त्यांच्या माध्यमातून कोविशिल्ड लस नागरिकांना दिली जाणार आहे. मागील दीड-दोन वर्षांपासून आपण कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहोत. कोरोनामुळे आपल्या सर्वांचं नुकसान झाले”.

”देशातील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले. तर, निश्चितपणे आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणार आहोत. त्यामुळे प्रभागातील सर्वांचे लसीकरण व्हावे यासाठी ही मोहिम हाती घेतली. शहरात विविध ठिकाणी लस उपलब्ध करुन दिली. तर, वेगाने लसीकरण होईल. आज गवळीनगर प्रभागात मोहिम होत आहे. भविष्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून शहरात अनेक ठिकाणी नागरिकांना लस देण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून सखुबाई गवळी उद्यान, गंगोत्री पार्क येथे लसीकरण केंद्र सुरु केले. परंतु, लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. लोकांना वेळेत लस मिळत नाही. पहाटे अडीच ते तीन वाजता येऊन नागरिकांना रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे लोकांना मनस्ताप होत होता. त्यासाठी मोफत लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतून गवळीनगर प्रभागातील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण होईल”, असा विश्वासही नगरसेवक गव्हाणे यांनी व्यक्त केला.

प्रियदर्शनी स्कुलचे राजेंद्र सिंग म्हणाले, “कोरोनामुळे शाळा बंद पडल्या आणि ऑनलाईन शिक्षण चालू झाले. परंतु, शाळेत लसीकरण सुरू झाल्याने शाळा लोकांसाठी उपयोगी आल्याचा आनंद होत आहे. नगरसेवक अजित गव्हाणे यांनी नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू केले. त्यासाठी शाळा उपलब्ध करून देता आली. लसीकरणासाठी आज शाळेत गर्दी झाली. विद्यार्थ्यांचे पालक आले. हे चित्र पाहून बरं वाटलं. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे”

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.