Bhosari News: संमिश्र शिक्षणव्यवस्था ही काळाची गरज – प्रदीप कदम

एमपीसी न्यूज – संमिश्र शिक्षण पद्धती ही काळाची गरज आहे. चिंता, चिंतन, व्यथा, व्यवस्था आणि दशा, दिशा ही पारंपारिक व्यवस्था बदलण्याचे काम ऑनलाईन शिक्षण पद्धती करीत आहे. गुरुकुल शिक्षण व्यवस्थेपासून सुरु झालेली शिक्षण व्यवस्था आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास या शिक्षण पद्धतीने सुरु केला आहे, असे मत शिव व्याख्याते प्रदिप कदम यांनी व्यक्त केले.

इंद्रायणीनगर भोसरी येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयामध्ये मंगळवार आणि बुधवारी चौथी प्रकाश व्याख्यानमाला पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ कवी प्रा . चंद्रकांत वानखेडे, दिल्ली ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखाच्या अध्यक्षा रूचिरा सुराणा, सस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अशोक पगारिया, उपाध्यक्ष विलास पगारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सदाशिव कांबळे, मुख्य संयोजक प्रा. पांडुरंग भास्कर, प्रा. डॉ . विजय निकम, प्रा. प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.

चंदकांत वानखेडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात बदलत्या संस्कृतीचे चित्र आपल्या काव्यांतून व्यक्‍त करून बदलत्या भाव विश्वाचे सामाजिक चित्रण व्यक्‍त केले.

व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. अशोक थोरात यांनी ऑनलाईन माध्यमातून गुंफताना नव्या शैक्षणिक धोरणाचा आढावा घेतला. सर्वांगीण विकास हेच नव्या शैक्षणिक हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे मध्यवर्ती सूत्र असून आवडीनुसार व व्यक्तीच्या क्षमतेनुसार नव्या शैक्षणिक धोरणात सर्वांना शिक्षण घेता येणार आहे. नवे शैक्षणिक धोरण हे पाचसूत्रांवर आधारीत आहे. त्यामध्ये स्वदेशी धोरण, विभाजन, प्रक्रियेविरोधी सुड, संधोधनाला प्राधान्य, संलग्नीकरण व कौशल्य गुणवत्ता या पंचसूत्रीवर आधारीत असून परंपस आणि आधुनिक काळाची गरज परस्थितीनुरूप मांडण्याचा प्रयत्न नव्या शैक्षणिक धोरण मांडणा-या विचारवंतानी केलेला आहे . हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे यश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.