Bhosari News : अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची धमकी देणाऱ्या नातेवाईक तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून (Bhosari News) मामाच्या 14 वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिला पळवून नेण्याची धमकी दिली. याप्रकरणी 32 वर्षीय मामीच्या फिर्यादीवरून 25 वर्षीय भाच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2020 पासून 19 नोव्हेंबर 2022 या कालावधीत भोसरी परिसरात घडला.

Akurdi News: शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा; विविध सामाजिक संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या नणंदेचा मुलगा आरोपीने फिर्यादीच्या 14 वर्षीय मुलीला फोन केले. मुलीच्या शाळेपर्यंत तिचा पाठलाग केला. तुला माझ्यासोबत बोलायचे नाही ना. ठीक आहे. मला आता तुझे घर आणि शाळा माहिती झाली आहे. मी कधीही तुला उचलून घेऊन जाईल. तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी (Bhosari News) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.