Bhosari News : ‘दक्षता फ्रीज बॅग’ घरातील भाजी, फळे, कडधान्य यांचा सुरक्षा रक्षक

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे आपले राहणीमान व सवयी यांच्यात बदल झाले आहेत. या आजाराने आपल्याला पुन्हा एकदा स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. स्वच्छता आणि सुरक्षा याची प्राथमिकता लक्षात घेऊन ‘दक्षता फ्रीज बॅग’ तयार करण्यात आली आहे. ‘दक्षता फ्रीज बॅग’ प्रत्येक घरातील भाजी, फळे, कडधान्य यांचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करते.

फ्रीजमध्ये भाजीपाला, फळे, फुले, कडधान्य यांना अनेक दिवस ताजे तवाने ठेवण्यासाठी या बॅगचा उपयोग होतो. या फ्रीज बॅगच्या एका सेटमध्ये एकूण पाच वेगवेगळ्या आकाराच्या बॅग असतात.या बॕग एअरपॕक असून बॅगला आतुन कापडी अस्तर लावण्यात आले आहे. हे कापड भाज्यांमधील पाणी शोषून घेते. त्यामुळे भाज्या, फळे, फुले जास्त दिवस टिकतात. शिवाय भाज्यांचा वास इतर पदार्थांना लागत नाही. तसेच कडधान्ये, डाळी, रवा, पिठं ठेवण्यासाठी या बॅग अत्यंत उपयुक्त आहेत.


याशिवाय चांदीची भांडी, मोत्याचे दागिने ठेवण्यासाठी सुद्धा या बॅगा उपयुक्त आहेत. या बॅग स्वच्छ धुता देखील येतात. कडधान्याला लवकर मोड आणण्यासाठी कडधान्ये भिजवून, निथळून या बॅगमध्ये ठेवता येतात.

मालाचा उत्तम दर्जा आणि सोसायटीतील ग्राहकांची वाढती मागणी यामुळे दिवसेंदिवस आमचा व्यवसाय वाढत आहे, अशी माहिती दक्षता बॅगच्या संचालिका प्रतिभा घुंगुर्डे यांनी दिली. वाढती मागणी लक्षात घेता बॅगची ऑन स्पॉट डिलीव्हरी सेवा प्रत्येक परिसरात सुरु केली आहे. पुण्याबाहेर मुंबई, नाशिक येथे कुरिअर मार्फत बॅग पोहोचवली जाते.

महत्त्वाचे मुद्दे

– पारदर्शक व गडद रंगात फ्रीज बॅग उपलब्ध

– जीर्ण झालेली फ्रीज बॅग परत घेऊन नविन बॅगचा संपुर्ण सेट दिला जातो (सशुल्क)

– ऑनलाईन पेमेंट, गुगल पे, पेटीएम सेवा उपलब्ध

– पुणे, मुंबई, नाशिक व इतर ठिकाणी कुरिअर मार्फत सशुल्क होम डिलीव्हरी

– कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करुन होम डिलीव्हरी सेवा

– फ्रीज बॕगमध्ये भाज्या टिकण्याचा कालावधीः कोबी-15 दिवस/ टॉमॕटो-15 दिवस/ काकडी-15 दिवस/दोडका- 7 दिवस/मटकी- 16 दिवस/पुदिना – 07 दिवस

संपर्क क्रमांक :
प्रतिभा अनुप घुंगुर्डे
8010105692, 8999430734

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.