Bhosari News: भोसरी रुग्णालयातील आयसीयू बेड्सचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सीएसआरफंडातून दिलेल्या 16 बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले.

महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, स्थायी सभापती अॅड. नितीन लांडगे,  अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसेवक अजित गव्हाणे, रवी लांडगे, विक्रांत लांडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, सारीका लांडगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेटटी, ‍सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,  ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कॅप जेमिनी कंपनी कडून महापालिकेस 10 आय.सी.यू यूनीट, 6 व्हेन्टीलेटर, 10 मोनिटर, 10 सिरींज पंप, 10 बेड साईड लॉकर, 1 हाई पॉवर एक्सरे मशीन, 1 सोनोग्राफी मशीन, 2 बायोमेडीकल वेस्ट कंटेनर, 1 वॉटर प्यूरीफायर, आदी सुमारे 2 कोटी 50 लाखाची साहीत्य सी एस आर फंडातून  सुपुर्द करण्यात आले. वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी रुग्णालयाची माहिती पवार यांना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.