Bhosari News : अतिक्रमण कारवाईला विरोध करणारे टपरीधारक ताब्यात आणि सुटका

एमपीसी न्यूज – गवळीमाथा येथील अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या टपरीधारक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना कुणाला धक्काबुक्की केली नाही. कुठल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली नाही. फक्त आमच्या टपऱ्या पाडू नका म्हणून त्यांनी विरोध करून रस्त्यावर बसायचा प्रयत्न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची भूमिका चुकीची असल्याचे बाबा कांबळे यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोडून दिले.

टपरी पथारी हातगाडी पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले, टपरीधारकांवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली. टपरीधारक कार्यकर्त्याने अतिक्रमण कारवाईस विरोध केला म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे घेऊन गेले. त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करायची प्रकिया सुरू केली.

कार्यकर्त्यांनी कुणाला धक्काबुक्की केली नाही. कुठल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली नाही. फक्त आमच्या टपऱ्या पाडू नका म्हणून त्यांनी विरोध करून रस्त्यावर बसायचा प्रयत्न केला एवढ्या छोट्याशा कारणावरून त्यांना डायरेक्ट अटक करून 353 सारखा गंभीर गुन्हा कसा दाखल करू शकता. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना संपर्क करून गोरगरीब टपरीधारकांवरती अन्याय होत आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.

गुन्हे दाखल होऊ नये अशी विनंती केली असता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ताबडतोब या प्रकरणी लक्ष घालून गुन्हे न दाखल करण्याचे आदेश दिले. ताब्यात घेतलेले 8ते 10 कार्यकर्त्यांना पोलिसांनी गुन्हा दाखल न करता सोडून दिले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,  मंचक इप्पर, सुधीर हिरेमठ यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि टपरीधारक कार्यकर्त्यांना न्याय दिला याबद्दल आम्ही पोलिस प्रशासनाचे मनापासून आभार मानतो. अतिक्रमण पथकाने केलेल्या चुकीचा कारवाई विरोधामध्ये महापालिका आयुक्त यांना निवेदन देणार असून कारवाई झालेल्या सर्व टपरी धारकांना लायसन देण्यात यावे त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.