Bhosari News : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भटक्या कुटुंबांना धान्य वाटप

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – समर्थ भारत यांच्या वतीने भोसरी परिसरातील नंदीवाले, बहुरुपी, मदारी, जोशी आदी भटक्या कुटुंबांना स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे औचित्य साधून धान्यवाटप करण्यात आले.

मंडळाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे म्हणाले “लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे मजूर, भिक्षेकरी, नंदीवाले, मदारी, जोशी, बहुरूपी अशा भटक्या ज्ञातीसंस्थांचे नागरिकांचे रोजगार बंद झाले आहेत. भोसरी परिसरात विविध पालांमधून अशी कुटुंब राहत असून त्यांना धान्याच्या स्वरूपात मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – समर्थ भारत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने धान्य / निधी जमा करण्याचे आवाहन केले होते.

अतिशय कमी वेळात संवेदनशील नागरिकांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये सेवावर्धिनी पुणे, रोटरी क्लब निगडी, सिध्दीविनायक मंदीर ट्रस्ट, प्राधिकरण या संस्था व व्यक्तींनी सहयोग दिला.”

जमा झालेल्या रकमेमधून / धान्यामधून गहु, तांदूळ, डाळ, साखर, मिठ आदी 16 किलोचे एक याप्रमाणे 225 किराणा सामान किट तयार करण्यात आलेल्या आहेत. धर्मजागरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन गरजू कुटुंबाची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार करोनाविषयक सर्व नियमांचे पालन करुन आजपासून वाटप सुरु करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी संतोष सासवडे, दानेश तिमशेटी, मंडळाचे सहसचिव रमेश बनगोंडे, दिपक नलावडे, धर्मजागरण प्रमुख गुलाब लांडगे, रवी पाटील, संतोष आमले आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काशीनाथ खरसे, राजकुमार जाधव, सुजित गोरे आदींनी परिश्रम घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह माहेश्वर मराठे, निलेश क्षीरसागर, रमेश बनगोंडे, दिपक आफळे आदिंनी निधीसंकलनासाठी विशेष प्रयत्न केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.