Bhosari News: माजी नगरसेवक साहेबराव खरात यांचे कोरोनामुळे निधन

पालिकेच्या 2002 मध्ये झालेल्या तीन सदस्यीय निवडणुकीत साहेबराव खरात भोसरीतून अपक्ष निवडून आले होते. विधी समितीचे सभापतीपद देखील त्यांनी भूषविले आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक साहेबराव दगडू खरात यांचे मंगळवारी (दि.8) रात्री कोरोनामुळे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.

पालिकेच्या 2002 मध्ये झालेल्या तीन सदस्यीय निवडणुकीत साहेबराव खरात भोसरीतून अपक्ष निवडून आले होते. विधी समितीचे सभापतीपद देखील त्यांनी भूषविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते काम करत होते. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षही ते होते. आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. शोषित, वंचित, बहुजनांचा आवाज बनून ते पुढे होते. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असत.

साहेबराव खरात यांना गुरुवारी (दि.3) कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर भोसरीतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यांना निमोनिया झाला होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे सोमवारी नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले होते.

मंगळवारी रात्री त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.