Bhosari News : चौघांकडून इसमाला लोखंडी रॉड, चाकू, सिमेंटच्या गट्टूने मारहाण  

एमपीसी न्यूज – चौघांकडून इसमाला लोखंडी रॉड, चाकू, सिमेंटच्या गट्टूने मारहाण करण्यात आली. भोसरी येथील बालाजीनगर  येथे बुधवारी (दि.13) दुपारी 12.30 वा ही घटना घडली.

याबाबत रविंद्र सुबराव ताटे (वय 34, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांनी भोसरी एमआडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रूक्मिणी विनोद ताटे, बाबु काळे, सत्वशीला बाबु काळे आणि सुभाष वाघमारे ( सर्व रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) या चौघांविरोधात भारतीय दंड विधान कलम 326, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ विनोद सुबराव ताटे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींनी लोखंडी रॉड, चाकू, सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून विनोद ताटे यांना दुखापत केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी एमआडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.