-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari News : ‘फ्रिडम लाईफ फाउंडेशन’च्या वतीने दोन महिन्यात 56 हजारहून अधिक जेवण पाकिटांचे वाटप

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भोसरीतील ‘फ्रिडम लाईफ फाउंडेशन’ गेल्या दोन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील गोरगरीब, गरजू, भटके-विमुक्त, पालावर राहणारे तसेच अनाथ आश्रमांमध्ये मोफत अन्नदान करत आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांची उपासमार होत असतानाच्या कठीण प्रसंगात फ्रिडम लाईफ फाउंडेशन दोन महिन्यांपासून माणुसकीचे दर्शन घडवत असून, शेकडो भुकेल्या लोकांच्या एकवेळच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे.

कोरोना लॉकडाऊन काळामध्ये अनेक कष्टकरी लोकांचे काम बंद झाले. त्यामुळे रस्ते, पदपथ, उड्डाणपूल तसेच झोपडपट्टीत राहणारे, बस स्थानकात मुक्कामी राहणारे, मोकळ्या जागेत पाल ठोकून राहणाऱ्या गोरगरीबांचे दोन वेळच्या जेवणासाठी प्रचंड हाल झाले. हे दृश्य पाहून भोसरीतील फ्रिडम लाईफ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कर्चे-पाटील, उपाध्यक्षा शैलजा चौधरी, सचिव विजया भामरे, ज्योती आवटे, सविता नांद्रे, गौरवभाऊ सावंत, संतोष चोंदे, सौरभ सावंत, डॉ. अभय निकम, सचिन इंगळे, काशिनाथ शेलार, सुभाष गलांडे, अजित जाधव आदी पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गेल्या दोन महिन्यांपासून गोरगरीबांना अन्नपाण्याची व्यवस्था करत माणुसकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

फ्रिडम लाईफ फाऊंडेशनच्या वतीने भुकेने व्याकूळ होऊन रस्त्यावर फिरणारे, भटके-विमुक्त, पालावर राहणारे तसेच अनाथ आश्रमात राहणाऱ्यांना 15 एप्रिलपासून दररोज 1 हजार ते दीड हजार जेवणाची पाकिटे वाटत आहेत. आतापर्यंत त्यांनी 56 हजारहून अधिक जेवण पाकिटे वाटली आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाला दोन महिने पूर्ण झाली असून अन्नदानाचा उपक्रम आज देखील सुरू आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn