Bhosari News: नितीन गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वाबाबतच्या ‘‘हायवे ऑफ डेव्हलपमेंट’’ पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वाबाबत लेखक अशोकराव टाव्हरे लिखित “हायवे ऑफ डेव्हलपमेंट” या पुस्तकाचे प्रकाशन भोसरी येथे झाले.

भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत सहसंपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे, विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ऍड. सतिश गोरडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विलास लांडगे, भाजप पिंपरी-चिंचवड जिल्हा संघटन सरचिटणीस, प्रवक्ते अमोल थोरात व लेखक अशोक टाव्हरे आदी उपस्थित होते.

लेखक अशोकराव टाव्हरे हे कनेरसर ता. खेड येथील रहिवासी आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित “विकासाचा राजमार्ग” या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. गडकरी यांनी इंग्रजी पुस्तकासाठी लेखी परवानगी दिली होती.

1976  पासूनचे अभाविप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजयुमो, भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य ते विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ते केंद्रातील सर्वात कार्यक्षम मंत्री हा प्रवास लेखक अशोकराव टाव्हरे यांनी पुस्तकातून उलगडला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून नितीन गडकरी यांचे कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत जाण्यास मदत होईल, असे मत आमदार लांडगे यांनी व्यक्त केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.